राष्ट्रीय पुरस्कार विजेती, सुमधुर गळ्याची गायिका सावनी रवींद्र आणि तीची मुलगी शार्वी यांच्यासाठी यंदाचा मातृदिन फारच खास आहे. कारण सावनी पहिलाच मातृदिन तीच्या मुलीसोबत साजरा करणार आहे. तिने नुकतंच सावनी ओरिजनल या तीच्या युट्यूब सिरीजमधून आई आणि मुलीचं गोड नातं मांडणारं, 'मॉं कोई तुझसा नहीं' हे हिंदी गाणं नुकतंच प्रदर्शित केलं आहे.